
Sangli News: सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात एका 15 वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. झोपेत असताना सर्पदंश झाल्याची माहिती मिळाली आहे. श्रेया न्हावी असं शाळकरी मुलीचे नाव आहे. शनिवारी रात्री हा घटना घडली. रात्री जेव्हा तीला साप चावला त्यावेळी तीनं आरडाओरड केला. त्यानंतर नातेवाईकांनी तीला रात्रीच ग्रामीण दवाखान्यात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. गावात रात्री या घटनेमुळे गोंधळ निर्माण झाला.
मीडिया रिपोर्टनुसार, जत तालुक्यातील संख गावातील श्रेया ही नववीत शिकत होती. रात्रीच्या वेळी जेवून आपल्या जागेवर झोपली.नेमकी गावात वीज गेल्याने रात्री अंधार खुप झाला. रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. ती जागी होऊन आरडाओरड करू लागली. त्यानंतर घरच्या सदस्यांनी तीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तीला मृत झाल्याचे सांगितले.
रात्री मृतदेह शवविच्छेदना करून मृतदेह सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाईकांनी गावात हंबरडा फोडला. गावातील पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली. विषारी सापामुळे मुलीचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात एका तरुणाचा खून करण्यात आला याघटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.