मराठा आरक्षण (Archived, edited images)

दोन वर्षांच्या लढ्यानंतर मराठा समाजाला (Maratha Samaj)  महाराष्ट्रामध्ये 16% आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. मात्र अजूनही मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत, सरकार मराठा समाजाला दिलेली आश्वासन पाळतं नसल्याचं सांगत पुन्हा बेमुदत उपोषण करण्याची हाक सकल मराठा क्रांती महामोर्चा (Sakal Maratha Kranti Mahamorcha)  यांच्याकडून देण्यात आला आहे. 22 फेब्रुवारीपासून विविध मागण्यांसाठी मराठा समाज उपोषणाला (Hunger Strike)  बसणार आहे. महाराष्ट्रात मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक दुर्बल घटकांना 10% आरक्षणाचा निर्णय, मराठा समाजाला EWS आरक्षण गैरलागू

काय आहेत सकल मराठा क्रांती महामोर्चाच्या मागण्या?

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) तत्काळ कार्यान्वित करून जिल्हास्तरावर संस्थेचे केंद्र व कार्यालय सुरू करणं

आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घेणे

आंदोलनात मृत पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत

2016-2017 च्या काळात झालेल्या आंदोलनानंतर मंत्री रणजीत पाटील यांनी सारथी कार्यान्वित करण्याची आणि अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र सरकारने दिलेलं आश्वासन पाळलं नाही. या निषेधार्थ आता पुन्हा आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्धार केला आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये राज्यात लागू करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाला आव्हान देण्यासाठी अनेक याचिका दाखल करण्यात आला आहेत.