शिर्डीचे साई मंदिर (Shirdi Mandir) खुले करावे अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार, असा इशारा भाजप आमदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी दिला आहे. याशिवाय सुजय विखे यांनी राज्यातील मंदिरं खुली करण्याचीदेखील मागणी केली आहे.
आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा कारखाना येथे सपत्निक श्री गणेशाची विधीवत स्थापना केली. यावेळी सुजय विखे यांनी साई मंदिरासह राज्यातील सर्व मंदिरं खुले करण्याची मागणी केली. (हेही वाचा - Ganesh Chaturthi 2020: गणेश चतुर्थी निमित्त मुंबईच्या लालबागचा राजा गणपती मंडळात आरोग्य उत्सवाला सुरुवात; रक्त आणि प्लाझ्मा दान कॅम्पचे आयोजन)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अटींचे पालन करणारे राज्यात सर्व मंदिरं आता दर्शनासाठी खुली करा. मंदिरं खुली केल्याने संबंधित परिसरातील नागरिकांना रोजगार मिळणं शक्य होईल. राज्य सरकारने मॉल, दुकानं, हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे आता मंदिर बंद ठेवणं योग्य ठरणार नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.
केंद्र सरकारने आखून दिलेल्या नियमावलीनुसार, देशातील वैष्णोदेवी, तिरुपती आदी मंदिरं दर्शनासाठी सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे आता शिर्डीच्या साईमंदिरासही सरकारने परवानगी द्यावी. शिर्डीचं सर्व अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. लवकरचं ग्रामस्थांच्यावतीने मंदिर खुलं करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. परंतु, सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशारादेखील सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.