Prime Minister Narendra Modi (Photo Credits: ANI)

ठाणे जिल्ह्यातील (Thane) भिवंडी (Bhiwandi) शहरातील पटेल कंपाऊंडमधील (Patel Compound) जिलानी तीन मजली इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाल्याचे समजत आहे. दरम्यान, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरुच आहे. या घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेत मरण पावलेल्या लोकांना त्यांनी श्रद्धांजली वाहली असून दुर्घटनाग्रस्तांना योग्य ती मदत दिली जाणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

भिवंडी दुर्घटनेनंतर नरेंद्री मोदी यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहली आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेले नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्राथनाही त्यांनी केली आहे. महत्वाचे म्हणजे, दुर्घटनाग्रस्तांना योग्य ती मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी ट्विटरच्या माध्यामातून दिले आहे. हे देखील वाचा-Bhiwandi Building Collapse Update: भिवंडी येथील पटेल कंपाऊंडमधील इमारत कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

नरेंद्र मोदी यांचे ट्विट-

 

मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीत साधारण 25 कुटुंब राहात होते. या भयंकर घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.