SadaBhau Khot On Tomato Price Hike: गेल्या काही दिवसांपासून देशाभरात टोमॅटोच्या किंंमतीने उच्चांकी गाठली (Tomato Price Hike) आहे. महाराष्ट्रात देखील असेच चित्रण पाहायला मिळत आहे. टोमॅटोच्या किंमतीमुळे नागरिक वैतागले आहे. बाजारपेठेत टोमॅटो हा 150 ते 160 रुपयांना विकला जात आहे. पाऊस लांबणीला गेल्यामुळे टोमॅटोसह अनेक भाजीपाला देखील महाग झाला आहे. ह्या किंमती बघून सर्वसामान्य जनतेचा पारा चढला आहे. त्यामुळे नागरिक सरकरला जबाबदार धरत आहे.
दरम्यान माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवरून आक्रोश करणाऱ्या शहरी नागरिकांना टोमणा मारला आहे. टोमॅटो मिळाला नाही म्हणून लगेच दोन-चार जण टाचा खुडून मेलेत का, असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी केला. सदाभाऊ खोत यांचे ह्या वक्तव्यमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.
आपल्याकडे काय फक्त टोमॅटोच आहेत का, फ्लावर हाय, कोबू हाय, बटाटू हाय, घेवडा हाय, शेवगा हाय, उडीद हाय, मूग हाय. टोमॅटो मिळाला नाही म्हणून दोन-चार जण टाचा खुडून मेली आहेत का? टोमॅटो काय जीवनावश्यक वस्तू आहे का, असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला. 'महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'शी बोलताना सदाभाऊ खोत यांनी टोमॅटोच्या वाढलेल्या दरांविषयी भाष्य केले.