Saamana Article: मुख्यमंत्री पदाची वरमाला गळ्यात घातली पण मंत्रीमंडळ जन्माला आलं नाही, सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरकारवर हल्लाबोल
Saamana Editorial (PC - File Image)

राज्यात नवीन सरकार स्थापन होवून एक महिना पूर्ण झाला तरी देखील मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त काही निघालाचं नाही. शिंदे सरकारवर मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्दयावरुन दररोज विरोधकांकडून ताशेरे ओढले जातात. तरी राज्यात मंत्रीमंडळाचं भिजत घोंगडचं आहे. फक्त मुख्यमंत्री (CM) आणि उपमुख्यमंत्री (Deputy CM) हे दोघं मिळून संपूर्ण राज्याचा कारभार बघत आहेत. तर विनाकुठल्या खात्याच्या आणि विनाकुठल्या मंत्र्याच्या 700 हून अधिक  जीआर (GR) या एक महिन्याच्या  कालावधीत काढण्यात आले आहेत. मंत्रीमंडळ विस्तार आणि शिंदे गट विरुध्द ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु असलेल्या संघर्षावरुन आज सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Article) शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

 

लग्न झाल्यावर पाळणा हलला नाही की लोक संशयाने पाहतात व दांपत्यास अनेक सल्ले देतात. शिंदे यांच्याबाबत तेच सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाची वरमाला बळेबळे गळ्यात घालून घेतली, पण मंत्रिमंडळ जन्माला येत नाही. त्यामुळे शिंदे -फडणवीसांच्या (CM Eknath Shinde an Deputy CM Devendra Fadnavis) मधुचंद्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्ष सोडला नाही तर पक्षांतर बंदी का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना शिंदे यांचेच डोके ठणकत राहील व एक दिवस त्यांना त्या डोक्यावरचे केस उपटत बसावे लागेल, असा घणाघात सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरक्रवर करण्याता आला आहे. (हे ही वाचा:- CM Eknath Shinde: रखडला मंत्रिमंडळ विस्तार, सचिवांना मंत्र्यांचे अधिकार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कामगिरी)

 

तसेच सर्वोच्च न्यालयात (Supreme Court) सुरु असलेल्या सत्तासंघार्षा बाबत देखील  सामनातून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. शिंदे गटाकडे कायद्याने दोनच पर्याय आहेत. एक तर त्या सर्व लोकांनी राजीनामे (Resignation) द्यावेत व पुन्हा निवडून यावे. दुसरे म्हणजे, या फुटीर गटाने दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन व्हावे, असा पेच शिंद्यांपुढे पडला आहे. त्याला त्यांच्या गटातील किती आमदार होकार देतील हा प्रश्नच आहे. पुन्हा मंत्रिपदासाठी त्यांच्या गटात मारामाऱ्या होणार, हेही उघड आहे. त्यामुळे नव्या औषधोपचारासाठी शिंदे हे आजारी पडले असावेत, अशी बोचरी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. तरी शिवसेना (Shiv Sena) खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सध्या ईडीची कारवाई सुरु असल्याने शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' (Saamana) ची धुरा देखील पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या हाती घेतली आहे. आजचा सामनातील अग्रलेख बघता पहिल्याचं दिवशी मुख्य संपादक म्हणून उध्दव ठाकरेंनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.