RSS Dussehra Melava: स्त्रीशक्ती देशासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ही शक्ती घरात बंदिस्त करुन ठेवणे योग्य नव्हे. या शक्तीला अधिक सशक्त बनविण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन देशहितासाठी त्याचा व्यापक फायदा करुन घेता येईल. स्त्रीशक्तीला वगळून कोणतीही संघटना उभारता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) मोहन भागवत (RSS chief Mohan Bhagwat) यांनी महिलां शक्तीविषयी भाष्य केले. विजयादशमी निमित्त आयोजित दसरा मेळव्याला (RSS Vijayadashami 2022) संबोधित करताना ते नागपूर येथे बोलत होते. या वेळी मोहन भागवत यांनी विविध विषयांवर भाष्य केले. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे आपण येथे वाचू शकता.
आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत पुढे म्हणाले की, योगासने आणि व्यायामाचा सराव करावा. वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक आरोग्याच्या सवयी विकसित केल्या पाहिजेत. जर लोकांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या जुन्या सवयी आणि वृत्ती चालू ठेवल्या तर कोणतीच व्यवस्था सर्वांसाठी आरोग्य सुनिश्चित ठरु शकणार नाही. (हेही वाचा, Mohan Bhagwat On Modi Government: मोहन भागवतांनी केले मोदी सरकारचे कौतुक, म्हणाले - भारत आपल्या राष्ट्रीयत्वापेक्षा मोठा असेल)
चांगले संस्कार संस्कार आणि पालकांची कर्तव्ये, सामाजिक वर्तन आणि शिस्तीवर प्रभाव टाकणारी माध्यमे, सार्वजनिक व्यक्ती, सण आणि सामाजिक मेळावे हे चारित्र्य घडवण्यात. समाजविकासात प्रमुख भूमिका बजावतात. त्याकडे आपण लक्ष द्यायला हवे, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.
आरएसएस प्रमुख म्हणाले, मातृभाषेतून शिक्षणाला चालना देण्यासाठी धोरण आखावे. विद्यार्थी पुढे जाऊन चांगला माणूस बनले पाहिजेत. त्यांच्यात देशभक्ती रुजली पाहिजे आणि ते सुसंस्कृत नागरिक बनले पाहिजेत, या हेतूने नवीन शैक्षणिक धोरण आखण्यात आले आहे, असे सरसंघचालकांनी या वेळी सांगितले.
मोहन भागवत यांनी सनातन धर्मावर भर देत सांगितले की, आपल्या सनातन धर्माच्या आड येणारा दुसरा प्रकार भारताच्या एकात्मतेला आणि प्रगतीला विरोध करणाऱ्या शक्तींनी निर्माण केला आहे. ते खोट्या गोष्टी पसरवतात, अराजकाला प्रोत्साहन देतात. गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंततात, दहशतवाद, संघर्ष आणि सामाजिक अशांतता पसरवतात.
स्वार्थ आणि द्वेषाच्या जोरावर समाजातील विविध घटकांमध्ये अंतर आणि वैर निर्माण करण्याचे काम स्वतंत्र भारतातही सुरू आहे. त्यांच्या भानगडीत न पडता, त्यांची भाषा, पंथ, प्रांत किंवा धोरण काहीही असो, त्यांच्याशी निर्दयीपणे वागले पाहिजे आणि निर्भयपणे त्यांना नाकारले पाहिजे, असे अवाहनही सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले..
भागवत पुढे म्हणाले की, ‘आत्मनिर्भर’ मार्गावर पुढे जाण्यासाठी, आपल्याला राष्ट्र म्हणून परिभाषित करणारे मूलभूत सिद्धांत आणि कल्पना समजून घेणे आवश्यक आहे. हे सिद्धांत स्पष्टपणे आत्मसात केले जातील आणि सरकार, प्रशासन आणि समाज यांना तितकेच समजले पाहिजे ही एक आवश्यक पूर्व अट आहे.