मुंबई-बंगळुरू महामार्गावर (Mumbai- Benglore Highway) देहूरोड (Dehu Road) येथे आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजत आहे. एक स्विफ्ट कार (Swift Car) ट्रकची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कर आणि ट्रक मधील ही धडक इतकी प्रचंड होती की यामध्य कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.
ANI ट्विट
Maharashtra: Three people killed, one injured in collision between a car and truck at Dehuroad on Pune-Bengaluru highway, today. pic.twitter.com/TReN1M7K8v
— ANI (@ANI) July 7, 2019
सूत्रांच्या माहितीनुसार, आज पहाटेच्या दरम्यान देहूरोडवर हा अपघात झाला. पावसामुळे समोरचे काहीच दिसत नसल्याने भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात स्विफ्ट कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोनजण जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, मागील काही दिवसात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते खराब झाले आहेत, त्याचप्रमाणे सकाळच्या वेळेत धुकं आणि पाऊस दोन्ही असल्याने वाहन चालवताना खबरदारी बाळगणे अत्यावश्यक आहे.