बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai Accident News) शहराजवळील चनई परिसरात आज दुपारच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन वैद्यकीय अधिकारी यांचा मृत्यू झाला आहे. धारूरहुन चनई परिसरातून अंबाजोगाईकडे येताना त्यांची कार एका झाडावर आदळली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी कारच्या दिशेने धाव घेतली. कारचा पुढच्या काचांचा चक्काचूर झाला होता. काही नागरिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली.
या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार दुपारी एकच्या सुमारास धारूरहुन चनई परिसरातून अंबाजोगाईच्या दिशेने एक भरधाव कार निघाली असता ती झाडावर आढळली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी कारच्या दिशेने धाव घेतली. कारचा पुढच्या काचांचा चक्काचूर झाला होता. काही नागरिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली.
या भीषण अपघातानंतर नागरिकांनी कारमधील लोकांना बाहेर काढण्यापुर्वीच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यामध्ये अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील दोन डॉक्टरांचा समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी सातपुते या अपघातात मृत्यू झाला आहे.