Reckless Driving By BEST Bus Driver (PC - X/ @jituk9)

Reckless Driving By BEST Bus Driver: मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट चालकाचे (Best Driver) काही धोकादायक ड्रायव्हिंग कौशल्य दाखवणारा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) झाला आहे. 29 मार्च रोजी 'जीतू' या वापरकर्त्याने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केलेल्या व्हिडिओने मुंबईकर आणि अधिकाऱ्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. 3-सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, बेस्ट बस चालक भरदिवसा व्यस्त रस्त्यावर सिग्नल सुरू असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहे. एवढचं नाही तर ड्रायव्हर बस चुकीच्या दिशेने चालवतानाही दिसत आहे. वेळेपेक्षा लवकर गंतव्य स्थानकावर पोहोचण्याच्या संभाव्य प्रयत्नात बस पुढे घेऊन तो सिग्नलवरून पटकन निसटतो.

व्हिडिओमध्ये दिसणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक A-124 दर्शवते. A-214 वरळी बस डेपो ते कुलाबा बस स्थानक दरम्यान धावते. कुलाबा परिसरातून प्रवास करून प्रवास संपवण्यापूर्वी बस तारदेव, भिंडी बाजार आणि भुलेश्वर भागांसह सोबोमधील प्रमुख व्यस्त भागांमधून जाते. (हेही वाचा -Bike Stunt Video: भररस्त्यात बाईकवर स्टंटबाजी, भरावा लागला 5 हजार रुपयांचा दंड)

व्हायरल व्हिडिओवर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया -

नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करत बेदरकारपणे बस चालवणाऱ्या चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या एक्स वापरकर्त्याने स्वतः मुंबई पोलिस, बेस्टच्या अधिकृत एक्स हँडलसह डीजीपी महाराष्ट्र आणि मुंबईचे विशेष आयुक्त आयपीएस देवेन भारती यांच्या अधिकृत हँडलला टॅग केले आहे.

व्हिडिओवरील काही प्रतिक्रिया -

बेस्ट बसच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीच नाही तर यावेळी अधिकाऱ्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकृत हँडलने व्हिडिओवरील टिप्पणीमध्ये मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत हँडलला टॅग केले. जेणेकरून व्हिडिओ वाहतूक पोलिसांच्या लक्षात येईल. त्यानंतर, वाहतूक पोलिसांनी घटनेवर आवश्यक कारवाई करण्यासाठी नेमके ठिकाण विचारले. 'कृपया आवश्यक कारवाईसाठी नेमके ठिकाण द्या,' असे मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या प्रतिसादात म्हटले आहे.

बेस्टने तक्रारीवर कारवाईचे आश्वासन दिले

बेस्ट उपक्रमाने अखेर व्हायरल झालेल्या व्हिडीओला प्रतिसाद देत या प्रकरणी अधिकाऱ्यांकडून आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. बेस्टने त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, संबंधित प्रकरण वरळी डेपो मॅनेजरकडे आवश्यक कारवाईसाठी पाठवण्यात आले आहे.