प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Pixabay)

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात 30 सप्टेंबर हा दिवस 'काळा दिवस' समजला जातो. 25 वर्षांपूर्वी लातूर-उस्मानाबाद भागात विनाशकारी भूकंप आला होता. ज्यात सुमारे 10 हजार लोक मृत्यूमुखी पडले आणि अनेक जखमी झाले. पण विशेष म्हणजे इतक्या वर्षानंतरही या नैसर्गिक आपत्तीमधून बचावलेले लोक नुकसानभरपाईची प्रतिक्षा करत आहेत.

यात मजूर सुर्यवंशी तानाजी यांना दुहेरी शिक्षा मिळाली आहे. त्यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाला गमावले नाही तर त्यांची 6.5 एकर जमीन सरकारने पुर्नविकासाच्या नावाखाली घेतली. ते पत्नी आणि 13 वर्षांच्या मुलासोबत पत्र्याच्या लहानशा झोपडीत राहतात. त्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. येथील सर्वच लोक 30 सप्टेंबर हा दिवस काळा दिवस असल्याचे मानतात आणि या दिवशी संपूर्ण गाव बंद असतं.

पुढे ते सांगतात की, "ही नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा मी गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीत होतो.आवाज आल्याने ते घराच्या दिशेने धावले पण तोपर्यंत त्यांचे दगडाचे घर जमीनदोस्त झाले होते. त्यांनी कसेबसे पत्नी, आई आणि भावाला बाहेर काढले. पण त्यांचे वडील, 10 वर्षांचा मुलगा, भावाची बायको आणि तीन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यांनी सांगितले की, न्याय मागण्यासाठी त्यांनी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले पण काहीही साध्य झाले नाही."

किल्लारीचे अजून एक निवासी प्रशांत हरांगुले यांचीही परिस्थिती थोड्याफार प्रमाणात सारखीच. भूकंपात घर उद्धवस्त झाले. कुटुंबातील सदस्य जखमी झाले.

ते सांगतात की, तो प्रसंग आठवला की, "भूकंपाचे हादरे अजूनही जाणवतात. त्यांचे वडील धाडसी होते. त्यांनी देवावर विश्वास ठेवायला आणि आयुष्यात पुढे जायला शिकवले." इंडोनेशिया सुनामी : भूकंपाच्या तडाख्यात 384 जणांचा मृत्यू

तुळजापूर काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण यांनी सांगितले की, पीडितांना भरपूर मदत केली. पण त्यांच्या जखमा अजूनही भरल्या नाहीत. पुन्हा एकदा आयुष्यात स्थिरावण्याचा ते प्रयत्न करत आहेत.