Tiware Dam (Photo Credits-ANI)

रत्नागिरी (Ratnagiri) येथील तिवरे धरणफुटी (Tiware Dam) प्रकरणी आतापर्यंत 20 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर आज (7 जुलै) एका दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह एनडीआरफच्या जवांनांच्या हाती लागला आहे. मात्र अद्याप तीन जण बेपत्ता असल्याने शोधमोहिम सुरुच आहे.

राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तिवरे धरम वाहू लागले आहे. तसेच धरणाला भगदाड पडत असल्याचे दिसून येताच गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मात्र अखेर तासाभरात गावात पाणी शिरुन त्याच्या प्रवाहात घरांसह काहीजण वाहून गेल्याची दुर्घटना घडली. यामध्ये 22-24 जण वाहून गेल्याचे सांगण्यात येत होते. तर आतापर्यंत 20 जणांचे मृतदेह सापडले आहेत.

(रत्नागिरी: 'खेकड्यांनी भोक पाडल्यानं तिवरे धरण फुटलं' जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचे धक्कादायक विधान)

तर तिवरे धरणफुटी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत याबद्दल चौकशीचे आदेश दिले. मात्र जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरण हे खेकड्यांनी भोक पाडल्याने फुटले असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यांच्या या स्पष्टीकरणावरुन विरोधी पक्षातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.