Ratnagiri: सेल्फी घेण्याचा मोह एका दाम्पत्याच्या जीवावर बेतला; गुहागरमधील हेदवी येथील दुर्दैवी घटना
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

रत्नागिरीच्या (Ratnagiri) गुहागरमधील (Guhagar) हेदवी येथील 'बामणघळ' (Bamanghal) या ठिकाणी दोन्ही बाजूला उंच कडा आणि मध्येच समुद्राच्या येणाऱ्या लाटांचा अनोखा देखावा पाहण्यासाठी अनेक पर्यटक याठिकाणी गर्दी करतात. मात्र, याच ठिकाणी आज सेल्फी घेणे एका दाम्पत्याच्या जीवावर बेतले आहे. सेल्फी घेण्याच्या नादात तोल जाऊन समुद्रात पडलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचाही बडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

अनंत माणगावकर (वय,36) आणि सुचेना माणगावकर (वय, 33) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. हे दाम्पत्य ठाण्याहून आज सकाळी हेदेवीच्या किनाऱ्यावर फिरायला गेले होते. मात्र, त्यावेळी सेल्फी घेण्याच्या नादात सुचेना यांच्या तोल गेला आणि त्या समुद्रात पडल्या. सुचेना या पाण्यात पडल्याचे पाहताच त्यांना वाचवण्यासाठी अनंत यांनीदेखील पाण्यात उडी घेतली. पंरतु, पण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे सुचेना यांच्यासह अनंत हे देखील वाहून गेले. यात दोघांचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती न्युज 18 लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Maharashtra: दहिसर रेल्वे ट्रॅकवर अडकलेल्या 60 वर्षीय व्यक्तीचे मुंबई पोलिस कॉन्स्टेबलने वाचवले प्राण; पहा व्हिडिओ

याआधी धोकादायक ठिकाणांवरून सेल्फी घेण्याचा नादात अनेकांनी आपला जीव गमवला आहे. यामुळे अशा ठिकाणी जाताना आवश्यक ती काळजी घेण्याची नागरिकांना आवाहन केले जाते. मात्र, तरीदेखील काहीजण आपल्या जीव धोक्यात घालून सेल्फी घेत असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत.