Paithan Rape Case: सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपी फरार, पैठण येथील खळबळजनक घटना
Molestation | (Photo Credits: Archived, edited)

Paithan Rape Case: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar) पैठण भागातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेने पैठण गाव हादरलं आहे. या घटनेअंतर्गत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली आहे. पैठण पोलिस पथक आरोपीचा शोध घेत आहे. (हेही वाचा- दिल्लीत मैत्रिणीशी बोलण्यावरून वाद, तरुणाची चाकून भोसकून हत्या, तिघांना अटक)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पैठण भागात एकाने व्यक्तीने सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. दुपारी शाळेतून घरी जात असताना आरोपीने मुलीला रस्त्यावर रोखलं. जबरदस्तीने तिला  पेरु देतो असं सांगून घरी घेऊन गेला. तिच्यावर अत्याचार केला. बाळू ज्ञानोबा जाधव असे या आरोपी नराधमाचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी गावातून फरार आहे. घाबरून मुलगी घरी गेली. त्यानंतर मुलीने दोन दिवसांनंतर ही घटना पालकांना सांगितली. पालकांनी पैठण पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि पालकांच्या तक्रारीनुसार, पोलिस ठाण्यात बाळूवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी चौकशीनुसार, आरोपीने या आधी दोन वेळा मुलीची छेड काढली अशी माहिती मिळाली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. फरार आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी पथक नेमलं आहे. आरोपीवर पोस्को आणि बलात्कार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला एक मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.