Raosaheb Danve | (Photo Credits: Facebook)

केंद्रीय मंत्री, भाजप (BJP) नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या कार्यालयावर छापा टाकणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आल्याचे वृत्त आहे. या पाच कर्मचाऱ्यांनी कोणतेही वॉरंट नसताना दानवे यांच्या जालाना (Jalna District) जिल्ह्यातील जाफराबाद (Jafrabad ) येथील कार्यालयावर छापा टाकून झडती घेतली. कोणतेही वॉरंट नसताना ही झाडाझडती घेतल्याच्या कारणावरुन या पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने म्हटले आहे. रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. यात दोन पोलीस उप-निरिक्षकांचा समावेश असल्याचे समजते.

रावसाहेब दानवे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीत पोलीस कर्मचाऱ्यांकडून आपल्या कार्यालयात बेकायदेशीरपणे छापा टाकून झडती घेण्यात आल्याचे दानवे यांनी म्हटले होते. या तक्रारीवरुन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी कारवाई करत संबंधित पाच पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबीत केले. प्राप्त महितीनुसार, 11 जून या दिवशी जालना येथील जाफराबाद येथील कार्यालयात या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाड टाकली. ही धाड टाकून झडती घेण्यापूर्वी या पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तसेच, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे वॉरंटही नव्हते, असे दानवे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच, झडती घेतली तेव्हा पोलिसांकडून कार्यालयाती कर्मचाऱ्यांना शिविगाळ आणि धक्काबुक्कीही करण्यात आल्याचा आरोप दानवेे यांनी तक्रारीत केला आहे. (हेही वाचा, Loksabha Election 2024: नरेंद्र मोदी 2024 मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे भाकीत)

रावसाहेब दानवे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करण्यात आली. तेव्हा ही कारवाई संबंधित पोलिसांनी बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचे पुढे आले. त्यावरुन या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, उपनिरीक्षक युवराज पोठरे, नितीन काकरवाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग सोळंके तसंच कॉन्स्टेबल शाबान तडवी आणि सचिन तिडके

अशी निलंबीत पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी ही झडती नेमकी कोणत्या कारणास्त घेतली याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. पोलिसही या कारणाचा शोध घेत असल्याचे समजते.