Congress | (File Image)

महाविकास आघाडीच्या (MVA) रामटेकच्या (Ramtek)  उमेदवार रश्मी बर्वे यांच्या विरोधात दिलेल्या जात पडताळणी समितीच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून स्थगिती मिळाली आहे. मात्र निवडणूक लढू देण्याबाबतची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्यांची उमेदवारी रद्द झाली आहे. नागपूर खंडपीठात या प्रकरणी पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होणार आहे. पण रामटेकला मतदान 19 एप्रिलला होणार असल्याने रश्मी बर्वे यांना निवडणूक लढवता येणार नाही. आज न्यायालयात जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी रश्मी बर्वेंना दिलासा मिळाला असला तरी त्यांची उमेदवारी खारीज केल्याप्रकरणी दिलासा मिळालेला नाही. Loksabha Election 2024: रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय.

रामटेकच्या उमेदवार म्हणून कॉंग्रेस पक्षाने रश्मी बर्वे यांना जाहीर केले आहे. त्यांच्या एबी फॉर्मवर काँग्रेसने डमी उमेदवार म्हणून त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव दिले आहे. जात प्रमाणपत्रावरील आक्षेपामुळे रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला गेल्यास रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे हे पर्यायी उमेदवार म्हणून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. रामटेक लोकसभेची जागा ही SC राखीव जागा आहे. Navneet Rana Cast Certificate Case: नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र वैध .

वैशाली देविया यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जात प्रमाणपत्र तपासणी समितीने रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र बेकायदेशीर ठरवले आहे. यानंतर रश्मी बर्वे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. केवळ राजकीय फायद्यासाठी विविध पक्षांकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

माजी काँग्रेस नेते किशोर गजभिये यांनीही अपक्ष उमेदवार अर्ज भरत मविआ ला टेंशन दिले आहे.  रामटेकमधून वंचितच्या उमेदवाराने माघार घेत रामटेक मध्ये किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला आहे.