Ramzan 2019 Todays Iftar and Sehri Time: रमजान (Ramzan) महिन्यामध्ये 'रोजा' (Roja) ठेवणार्या प्रत्येकासाठी संध्याकाळी इफ्तार (Iftar Time) आणि पहाटेची सेहरीची (Sehri Time) वेळ अत्यंत महत्त्वाची असते. दिवसभर निर्जळी उपवास केल्यानंतर संध्याकाळी इफ्तारनंतर खाण्याची मुभा असते. आजच्या धकाधकीच्या बनलेल्या जीवनशैलीमध्ये ऑफिस, कामाच्या वेळा सांभाळत अनेकांना रोजाचं वेळापत्रकही सांभाळायचं असतं. मग आज मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद शहरामध्ये नेमका इफ्तारचा वेळ काय आहे हे जाणून घ्या. Ramadan 2019 Iftar & Sehri Timetable: 'इफ्तार' आणि 'सेहरी' ची मुंबई, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे शहरातील वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा
9 मे दिवशी मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद शहरामध्ये इफ्तारची वेळ काय?
मुंबईमध्ये आज इफ्तारची वेळ संध्याकाळी 7.05 मिनिटांची आहे. दुसर्या दिवशी सकाळी 4.47च्या सेहरीच्या वेळेपर्यंत मेजवानीचा आनंद घेता येणार आहे.तर पुण्यामध्ये आज संध्याकाळी 7.00 वाजण्याची इफ्तारची वेळ आहे तर सकाळी 4.44 ही सेहरीची वेळ आहे. नाशिकमध्ये आज संध्याकाळी 7.02 ही इफ्तारची वेळ आहे आणि सेहरी सकाळी 4.41 पर्यंत आहे. तर औरंगाबादमध्ये संध्याकाळी 6.56 ची इफ्तारची वेळ आहे आणि सेहरी 4.35ची आहे. त्यामुळे रोजा ठेवणारी व्यक्ती स्वतःचं आरोग्य जपण्यासाठी, डीहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून संध्याकाळी इफ्तारच्या वेळेपासून पहाटे सेहरीच्या वेळेपर्यंत आवडीचे पदार्थ खाण्याची मुभा आहे.
रोजा ठेवणारी व्यक्ती इफ्तारच्या वेळेस खजूर आणि पाणी यांचे सेवन करून दिवसभराचा उपवास सोडते. 7 मे ते 4 जून 2019 च्या काळात यंदा रमजान महिना आहे. मुस्लिम बांधवांसाठी हा महिना अत्यंत पवित्र असतो.