राजू शेट्टी | (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्रातील अवघ्या सहकार क्षेत्राचे, प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांचे लक्ष कोल्हापूर जिल्हाकडे लागले आहे. कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghtna) आयोजित 'ऊस परिषद 2022' (Raju Shetty Sugarcane Council) आज पार पडतआहे. या परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty ) काय भूमिका मांडतात याबाबत उत्सुकता आहे. पाठिमागील 22 वर्षे ही ऊस परिषद (Us Parishad) कोल्हापूर येथील जयसिंगपूर शहरात पार पडते. परिषदेसाठी मोठ्या प्रमाणावर उस उत्पादक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित राहतात. परिषदेचे यंदा 22 वे वर्ष आहे.

तुटणाऱ्या ऊसाला एकरकमी एफआरपी, वाढीव दर, कारखान्यांकडून होत असलेली काटामारी आणि पाठिमागील हंगामातील एफआरपी (FRP) अधिक दोनशे रुपये यांसारख्या अनेक मुद्द्यांवरुन आजची ऊस परिषद गाजण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेली अनेक आंदोलने या पूर्वी गाजली आहेत. त्यातील काही आंदोलनाला हिंसक वळणही लागले आहे. यात दूध दरवाढ आंदोलन, ऊस दर आंदोलन आदींचा समावेश आहे. तेव्हापासून ऊस परिषदेत काय बोलले जाते याकडे सर्वांचे बारीक लक्ष लागलेले असते.

प्राप्त माहितीनुसार, जयसींगपूर येथे ऊस परिषदेतीच तयारी पूर्ण झाली आहे. या परिषदेतच आज ऊस आंदोलनाबाबत पुढची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनीही बुधवारी (12 ऑक्टोबर) तसा इशारा दिला आहे. त्यामुळे आजच्या परिषदेत स्वाभिमानीची भूमिका ठरली जाण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या आधीही ईशारा दिला आहे की, केंद्र सरकारने अनेक गोष्टी ऑनलाईन केल्या आहेत. यात ई-पीक नोंदणी, सातबारा अशा गोष्टींचा उमेदवार आहे. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन नाहीत. हे वजनकाटेही ऑनलाईन करावेत. या वजन काट्यांवर साखर आयुक्तांनी नियंत्रण ठेवावे. हे काटे ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी स्वाभिमानीने या आधीही केली आहे.