राजू शेट्टी (Photo Credit : Facebook)

स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे (Swabhimani Shetkari Paksh) प्रमुख नेते राजू शेट्टी (Raju Shetti)  यांना आज मुंबईत मंत्रालयाबाहेर (Mantralaya) आंदोलन करताना 25 कार्यकर्त्यांसह अटक करण्यात आली आहे. प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी योजनेचा करार त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज मंत्रालयासमोर हे आंदोलन केले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी दुधाच्या पिशव्या फोडून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबई पोलिसांनी या शेट्टी यांना देखील ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी योजनेचा करार हा सोळा राष्ट्रांशी करण्यात आला आहे. हा करार शेतकऱ्यांच्या हिताचा नसून यामुळे शेती, दुग्ध व्यवसाय आणि वस्त्रोद्योग या तिन्ही व्यवसायात काम करणाऱ्या जनतेला मोठा फटका बसू शकतो असा शेट्टी यांचा तर्क आहे.त्यामुळे हा करार त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी करत मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दूध फेकत सरकराचा निषेध केला.

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई मच्छीमार, शेतकरी यांना मिळण्यासाठी राज्यपाल मदत करणार - आदित्य ठाकरे यांची माहिती

दरम्यान, प्रादेशिक व्यापार व आर्थिक भागीदारी या कराराच्या संदर्भात राजू शेट्टी यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांची देखील भेट घेतली होती. या करारातून दुग्धजन्य पदार्थ , शेतमाल व कापड उद्योग वगळण्यात या संदर्भात चर्चा व निवेदन केले होते.