MNS New Flag: राज ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्यांचं अनावरण; 'शिवमुद्रा'चा समावेश
Raj Thackeray & MNS New Flag| Photo Credits: Facebook

MNS Mumbai Maha Adhiveshan 2020:  महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena)  अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी आज (23 जानेवारी) मनसेच्या नव्या झेंड्यांचं अनावरण केलं आहे. भगव्या रंगाच्या मनसेच्या नव्या झेंड्यावर (MNS New Flag) छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमुद्रा आहे. आज मुंबईतील गोरेगाव परिसरामध्ये मनसेचं पहिलं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान या मनसे महाअधिवेशनासाठी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते हजर आहेत. दरम्यान आज अनेक मनसे सैनिक आज भगव्या रंगाचे कपडे घालून महाअधिवेशनासाठी हजर राहिले आहेत. आता मनसे कार्यकर्त्यांचं लक्ष आज संध्याकाळी होणार्‍या राज ठाकरे यांच्या भाषणाकडे लागले आहे. आज मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदा वीर सावरकरांची प्रतिमा पहायला मिळाल्याने राज ठाकरे 'हिंदुत्त्वा'चा मुद्दा हायजॅक करणार का? यावरून आता राजकीय चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.  मुंबई: 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चं आज पहिलंं राज्यव्यापी अधिवेशन; मनसेचा नवा झेंडा ते अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग बाबत उत्सुकता

मनसेचा नवा झेंडा

MNS New Flag | Photo Credits: File Photo

मनसे पक्षाच्या स्थापनेच्या वेळेस झेंड्यावर निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग असलेला मनसेचा झेंडा बनला होता. मात्र आता 14 वर्षांनंतर मनसेचा झेंडा बदलला आहे. आज नवा झेंडा भगव्या रंगाचा आहे. दरम्यान आज मनसेच्या व्यासपीठावर वीर सावरकरांची प्रतिमा देखील ठेवण्यात आली आहे. महाअधिवेशनासाठी 15-20 हजार लोकांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

मनसे त्यांची वैचारिक भूमिका बदलणार का? अशी चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. आज मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टींवरील पडदा उठवला जाणार आहे.9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षाची स्थापना केली. पक्षाचा सुरुवातीचा प्रवास जसा आक्रमक होता तसाच तो बदलत्या काळासोबत मावळात गेला. 2009 साली राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यांचे 13 आमदार निवडून आले. परंतु, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मात्र पक्षाला एकाच जागी समाधान मानावे लागले.