महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज पहिलं राज्यव्यापी अधिवेशन मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. गोरेगाव येथील नेस्को संकुलामध्ये हे अधिवेशन होणार आहे. राज ठाकरेंच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्धाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरेंसह त्यांचा परिवार पोहचणार आहेत. त्यामुळे या महाअधिवेशनाच्या माध्यमातून राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग होणार का? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान आज मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण होणार आहे. त्याबाबतही महाराष्ट्रामध्ये उत्सुकता आहे. सकाळी 9 वाजल्यापासून या अधिवेशनाला सुरूवात होणार असून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. MNS New Flag: मनसेच्या नव्या झेंड्यावर येणार 'शिवराजमुद्रा'? 23 जानेवारीला राज ठाकरे करणार अनावरण.
आज होणाऱ्या सकाळी नऊ ते सायंकाळी सहादरम्यान मनसेच्या महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आलं आहे. या वेळातच वीज कपात केल्याने काल मनसैनिकांनी संताप व्यक्त केला होता. मनसेच्या महाअधिवेशनासाठी सध्या राज्यभरातून लोकं गोरेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. मनसे अधिकृत या त्यांच्या ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवण्यात आला आहे. त्या ठिकाणी आता फक्त रेल्वे इंजिनच दिसत आहे. त्यामुळे नवा झेंडा कसा असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
#मनसे_अधिवेशन #राजठाकरे #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रसैनिक #RajThackeray #MaharashtraDharma #HindaviSwarajya pic.twitter.com/uHifjcWUzA
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 21, 2020
काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेच्या मतदारांना या मुद्द्याच्या आधारावर आकर्षित करण्याचा मनसेचा विचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. त्यामुळे 'हिंदुत्त्वाचा' मुद्दा हायजॅक करणार का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मनसेच्या स्थापनेनंतर परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून मनसे राज्यभर आक्रमक झाली होती. त्याचा निवडणूकांमध्ये पक्षाला फायदा झाला होता आता त्याच धर्तीवर राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण करून त्यांना राजकीय कार्यक्रम देणार का? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.