महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी अचानक मध्येच पुणे दौरा सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. ठरलेल्या बैठकीला स्थानिक नेते वेळेवर न आल्याने राज ठाकरे हे रागावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच रागाने राज ठाकरे तडकाफडकी मुंबईकडे रवाना झाले. आगामी लोकसभेच्या (Loksabha Election) दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर (Pune Tour) आले होते. आज राज ठाकरे पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्वाची बैठक घेणार होते. पंरतू पदाधिकाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - Raj Thackeray On Maratha Aarakshan: 'राज्य सरकार कडून तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार'; राज ठाकरेंकडून मराठा समाजाला जागृत राहण्याचं आवाहन)
आज दुपारी ३ वाजता विभाग प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र राज ठाकरे हे नियोजित वेळेवर येऊन सुद्धा शहर कार्यालयात प्रमुख नेत्यांपैकी कोणीच नव्हते. त्यामुळे राज ठाकरे अचानक कार्यालयात आल्याने पदाधिकारी आणि नेत्यांची पळापळ सुरू झाली. त्यामुळेच राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.
राज ठाकरे गेल्यानंतर शहर कार्यालयात आता नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक मानली जात होती. पंरतू ही बैठक न होता राज ठाकरे मुंबईला रवाना झाले आहेत.