Raj Thackeray Meet CM Shinde

Raj Thackeray Meet CM Shinde: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी आज वर्षा निवास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकिय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली. या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. राज ठाकरे यांच्या सोबत मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान दुकानावरील मराठी पाट्यांसंदर्भात निर्णयानंतर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले या संदर्भात चर्चा केली असावी असे कारण समोर आले आहे. (हेही वाचा-राज्याच्या एन्ट्री पॉइंटवर राज्य सरकार आणि मनसे कॅमेऱ्यांची नजर- राज ठाकरे

राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. सोबत टोल संदर्भात देखील चर्चा केली अशी माहिती समोर येत आहे. ऑक्टोबर महिन्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोल मुद्दे  संदर्भात भेट घेतली होती. त्यानंतर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात भेट घेतली. एन्ट्री पाॅईट्स संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न विचारले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबतही बैठक पार पडली होती. मनसे कार्यकर्त्याने मराठी पाट्यासंदर्भात शहरात ठिकठिकाणी आंदोलन करत असताना दिसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली.  पोस्टमध्ये लिहल्याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी येऊन माझी भेट घेतली. या भेटीत राज्यातील टोल नाक्यांचा प्रश्न आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाईबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते.