नवी मुंबई च्या प्रस्तावित विमानतळाच्या (Navi Mumbai Airport) नामकरणाचा मुद्दा सध्या चर्चेमध्ये आहे. आज या प्रश्नी आमदार प्रशांत ठाकूर एका शिष्टमंडळासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीला गेले होते. यावेळी ठाकूर यांनी नवी मुंबईच्या विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याची त्यांची मागणी आहे. पण राज ठाकरेंनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई हे मुंबई विमानतळाचंच एक्सटेंशन असल्याने त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव संयुक्तिक असल्याची भावना बोलून दाखवली आहे. Navi Mumbai International Airport चा इथे पहा दिमाखादार अंदाज; GVK ने प्रतिक्षित विमानतळाचा Visionary First Look केला शेअर (Watch Video).
सध्या नवी मुंबई मध्ये स्थानिक दि बा पाटील यांच्या नावाचा रेटा धरत आहेत तर स्थानिक शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही आहे. यावरूनच सध्या दोघांमध्ये संघर्ष पेटला आहे. पण राज ठाकरेंनी नवी मुंबईचं विमानतळ हे मुंबईचंच आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या भूमीत जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने विमानतळ असेल तर तेच पुढे ठेवणं योग्य राहणार आहे. प्रशांत ठाकूर यांनाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आक्षेप नाही. असे ते म्हणाले आहेत.
सध्या मुंबई मध्ये विमानांच्या पार्किंगसाठी जागा कमी असल्याने नवी मुंबई मध्ये एक्सटेंशन दिले जात आहे. त्यामुळे नावावरून राडे करण्यापेक्षा केंद्र सरकारकडून विमानतळाचं काम कसं लवकर पूर्ण होईल यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा असे ते म्हणाले आहे. लोकं केवळ या नामांतराच्या मुद्द्यावर गुंतून राहतात पण ते दुर्देवी असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच आता छत्रपतींच्या नावापुढेही कोण आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरतय हे देखील बघतो असे राज ठाकरे म्हणाले आहे.