Jalgaon Rain (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्र पिचून गेला असताना राज्यात मुसळधार पावसाला देखील सुरुवात झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याला जबर फटका बसला असून प्रचंड नुकसान झाले आहे. तर काल रविवारी जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगावच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (Dr. Ulhas Patil Medical College and Hospital) पावसाचे पाणी आत शिरले. यामुळे या पूर्ण रुग्णालयात पाणीच पाणी झाले. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, या रुग्णालयात पाणी शिरल्यानंतर अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या 7-8 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

रविवारी (14 जून) ला महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातं पावसाने दमदार हजेरी लावली. कोकणच्या रत्नागिरी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडाच्या औरंगाबाद आणि विदर्भच्या गोंदिया जिल्ह्यात भरपूर पाऊस पडला. या मुसळधार पावसाचा जोर इतका होता की जळगावच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पावसाचे पाणी शिरले. Monsoon 2020 Updates: मध्य-नॉर्थ अरेबियन समुद्र, गुजरात आणि महाराष्ट्रासह 'या' भागात साऊथ वेस्ट मान्सून दाखल- IMD

या रुग्णालयात पुराप्रमाणे पाणी वाहत होते. मात्र येथील कर्मचा-यांनी रुग्णालयातील रुग्णांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवले. या पावसामुळे या रुग्णालयाचे प्रचंड नुकसाना झाले आहे.

तर दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाझत असून राज्यात एकूण 1 लाख 7 हजार 958 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यात 50 हजार 978 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ही आकडेवारी पाहता लोकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन योग्य ती काळजी घ्यावी अशी असे आवाहन राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे.