Monsoon In Maharashtra 2020 | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

मुंबईत (Mumbai) पावसाने चांगलाच जोर धरला असून गेल्या 22 तासांत मुंबईत अति मुसळधार पावसाची नोंद करण्यात आला आहे. मुंबईत सायन (Sion), दादर (Dadar), कुर्ला (Kurla), माटुंगा (Matunga) या भागात पावसाने काल (15 जुलै) दिवसभर धुमाकूळ घातला असून अनेक भागात वॉटर लॉगिंगची समस्या निर्माण झाली होती. तसेच मुंबईत सखोल भागात पाणी साचले होते. अंधेरी, सांताक्रूज, बांद्रासह पश्चिम उपनगरातही मुसळधार पाऊस झाला. ठाणे (Thane), भांडूप (Bhandup), मुलूंड (Mulund) भागात मात्र मध्यम स्वरुपाचा पाऊस नोंदवला गेला. मुंबईत आजही पावसाचा जोर कायम राहणार असून मुसळधार सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्या असे आवाहन हवामान खात्याचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी केले आहे.

मुंबईत गेल्या 22 तासांत बांद्र्यात 201, कुलाबा 152, सांताक्रूज 159.4, महालक्ष्मी 129, राम मंदिर 130 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. पावसाचा हा जोर आजही कायम राहणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

हेदेखील वाचा- Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पावसाचा सामना करण्यासाठी घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला आढावा (Watch Video)

मुंबईत(15 जुलै) सकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरांमधील काही भाग जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील सखल भागांमध्ये म्हणजेच हिंदमाता (Hindmata) आणि किंग्स सर्कल (Kings Circle) येथे पाणी साचले. तसंच अंधेरीतील काही भागांतही पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.