Mumbai Rain (Image Credit - ANI Twitter)

मुंबई शहरासह उपनगरात मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. वीजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्याच्या साथीने पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला असला तरी गुरुवारच्या सकाळ मुंबईतील अनेक भागात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलेले पहायला मिळाला. वादळी वाऱ्यामुळं काही ठिकाणी झाडे पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे देखील उडून गेले आहेत. मान्सूनच्या दिवसात बरसतो तसाच पाऊस मुंबईत बरसला. मुंबईच्या सर्वच भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

पहा व्हिडिओ -

 

पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस झाला. यामध्ये अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. जोगेश्वरीची पश्चिम दृतगती मार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला पहायला मिळाला आहे.

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तर काही ठिकाणी गीरपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.