Shiv Sena MLA Disqualification Case Verdict | (Photo credit: archived, edited, representative image)

उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेला ( Uddhav Thackeray Maha Patrakarparishad) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडूनही तातडीने प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी ठाकरे गटाकडून संवैधानिक पदांबाबत चूकीचा समज पसरवला जात असल्याचं म्हटलं आहे. 'ज्यांचा संवैधानिक संस्थांवर विश्वास नाही त्यांचा संविधानावर तरीही विश्वास आहे का?' असा सवाल त्यांनी विचारला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला 2013, 2018 च्या घटनादुरूस्तीचा दावा केला होता पण या पत्रामध्ये केवळ निवडणूकीचा निकाल देण्यात आला असून त्यामध्ये घटना दुरूस्तीची माहिती अथवा प्रत निवडणूक आयोगाला देण्यात आली नसल्याचं ते म्हणाले आहेत.

राहुल नार्वेकर यांनी आपण सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांप्रमाणेच निकाल दिला असल्याचं म्हटलं आहे. निवडणूक आयोगाकडून 1999 ची घटना आपल्याला देण्यात आली आणि त्या घटनेनुसारच आपण निकाल दिला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दोन गटाचे संख्याबळ, घटना, संघटनात्मक रचाना यावरून आपण निकाल दिला असल्याचा नार्वेकर म्हणाले आहेत. Uddhav Thackeray Maha Patrakarparishad: 2013 च्या शिवसेनेच्या घटनादुरूस्ती च्या ठरावाचा व्हीडिओ महापत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंकडून सादर .

अनिक परब यांच्याकडून वारंवार जो कागद दाखवला जातो त्यामध्ये कुठेही घटनेच्या दुरूस्तीचा उल्लेख नसल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले आहे. त्यामुळे आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रामाणेच निकाल दिला असल्यावर ते ठाम आहेत. तसेच 2018 मध्ये शिवसैनिक असलेल्या राहुल नार्वेकरांचा एक व्हीडिओ, फोटो ठाकरे गटाकडून दाखवला जात आहे त्याची पडताळणी केली नसल्याचं ते म्हणाले आहेत. पक्ष कुणाचा हा निर्णय देखील 'Triple  Test' चे निकष लावत दिला असल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

ठाकरे गटाकडून खोटं बोला पण रेटून बोला ही नीती वापरली जात असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे खोट्यापेक्षा अर्धसत्य अधिक धोकादायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता यापुढे आपण कोणत्याही आरोपांना उत्तर देणार नसल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले आहे.