नागपूर: कोविड 19 रुग्णांच्या सेवेचे कर्तव्य बजावून तब्बल महिन्याभरानंतर घरी परतलेल्या नर्सचे शेजाऱ्यांकडून पुष्पवर्षाव करत स्वागत; पहा व्हिडिओ
A Nurse, working in COVID19 ward welcomed by her neighbours (Photo Credits: ANI)

सध्या कोरोना व्हायरसचे गंभीर संकट संपूर्ण देशावर आहे. या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस सह विविध क्षेत्रातील अनेक कोरोना योद्धा जीव पणाला लावून काम करत आहेत. महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे निश्चितच राज्य सरकार सह आरोग्य यंत्रणेवरील भार अधिक आहे. म्हणूनच अनेक नर्सेस हॉस्पिटलमध्ये राहूनच रुग्णसेवेचे कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान नागपूर (Nagpur) येथील इंदिरा गांधी सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (Indira Gandhi Government Medical College & Hospital) मध्ये कार्यरत असणारी एक नर्स महिनाभरानंतर घरी परतली. राधिका विंचूरकर (Radhika Vinchurkar) असे त्या नर्सचे नाव आहे. महिनाभरानंतर घरी परतलेल्या राधिकाचे शेजारच्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून यात सर्व शेजारी राधिकावर पुष्पवर्षाव करत आहेत. टाळ्या वाजून तिच्या कार्याचे आणि तिचे कौतुक करत आहेत.

विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमात नागरिक सोशल टिस्टसिंगचे नियम पाळताना दिसत आहेत. तसंच सर्वांच्या चेहऱ्यावर मास्कही दिसत आहेत. यापूर्वी अनेक ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करुन परतलेल्या नर्सेचे आदरपूर्वक स्वागत केल्याचे व्हिडिओज समोर आले होते. 3 मे रोजी देशभरातील सर्व कोरोना योद्धांना तिन्ही दलांकडून विशेष सलामी देण्यात आली होती. (महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा; राज्यात आज एकूण 350 रुग्ण कोरोनामुक्त)

ANI Tweet:

 

सध्या महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 15525 इतकी झाली असून त्यापैकी 2819 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत. तर 617 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 12089 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.