Nagpur Woman Kills Daughter: नागपूर येथे 'Live-in Relationship' मध्ये राहणाऱ्या जोडप्यात भांडण, तीन वर्षांच्या मुलीची हत्या, महिलेस अटक
Rape And Murder (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Nagpur Murder Case: तरुण जोडप्यामध्ये झालेल्या घरगुती भांडणातून एका तीन वर्षाच्या मुलीचा हाकनाक बळी गेला आहे. नागपूर शहरातील अमर नगर येथे सोमवारी (20 मे) घडली. हे जोडपे परिसरात पत-पत्नी (Husband Wife Relationship) म्हणून राहात होते आणि कथीतरित्या त्यांचे परस्परांशी लिव्ह इन रिलेशनशीप (Live In Relationship) संबंध होते असे बोलले जात आहे. या संबंधातून त्यांना एक तीन वर्षांची मुलगी जन्माला आली होती. दरम्यान, त्यांच्यात सातत्याने भांडणे होते. नियमीतपणे होत असलेल्या अशाच भांडण टोकाला गेले आणि महिलेने आपल्या मुलीचा गळा घोटाल. धक्कादायक म्हणजे आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन ही महिला थेट नागपूर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आणि तिने आपल्या गुन्ह्याचीही कबुली दिली.

परस्पर संशयातून बिघडले संबंध

ट्विंकल राऊत (वय-23) असे महिलेचे नाव आहे. आरोप आहे की, तिने तिचा एकूलता एक मुलगा रियांशी हिची छाती आणि मान हिंसकपणे दाबली. ज्यामुळे श्वास गुदमरुन त्याचा मृत्यू झाला. मूळचे तुमसरचे असलेले हे दाम्पत्य नोकरीच्या चांगल्या संधीसाठी सुमारे तीन वर्षांपूर्वी नागपूर येथे आले होते. दोघेही एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामाला होते आणि कामाच्या ठिकाणी दिलेल्या खोलीत राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याचे संबंध परस्पर संशयातून बिघडले होते, त्यामुळे वारंवार वाद होत होते. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये असताना दोघेही परस्परांकडे संशयाने पाहात होते. महिलेला संशय होता की, तिच्या पतीचे आणि आणखी एका महिलेचे अनैतिक संबंध आहेत. या कथीत संबंधांना घेऊन दोघांमध्ये जोरदार वाद होत असत. (हेही वाचा, Live-in Partner Murder: लिव्ह इन पर्टनरची हत्या, घरातील कपाटात लपवला मृतदेह; दिल्ली येथील घटना)

चिमुकली रडली म्हणून दाबला गळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. आपले आईवडील भांडत असताना ही चिमूकली घाबरली आणि ती रडायला लागली. ती रडत असल्याचे पाहून महिला अधिकच चिडली आणि तिने तिची हत्या केली. अखेर रागाच्या भरात कृत्य केल्यानंतर ती मुलीला कडेवर घेऊन भान हरपून फिरत राहिली. जवळपास चार किलोमीटर अंतर एकटीच फिरत असताना ती गस्तीवर असलेल्या पोलिसांना दिसली. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचारापुर्वीच मुलीचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. त्यानंतर पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तसेच महिलेला ताब्यात घेतले. महिलेने आपल्या कृत्याची कबूली दिली. (हेही वाचा, HC on Live-In and Domestic Violence: लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलादेखील दाखल करू शकते घरगुती हिंसाचाराचा खटला- Kerala High Court)

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेला अटक केली आणि तिच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेला नियमानुसार कोर्टापुढे हजर केले असता तिला तिला 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे