Pune: मेट्रिमोनियल वेबसाइटवर महिलेची फसवणूक, 62 लाखांचा बसला फटका
Fraud । Representational Image | (Photo Credits: IANS)

Pune: पुणे येथील एका खासगी कंपनीत मॅनेजमेंटच्या पदी असलेल्या महिलेची 62 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की, ज्या व्यक्तीने तिच्याकडून ही लाखोंची रक्कम उकळली तो तिला मेट्रोमोनियल वेबसाइटवर भेटला होता. त्याने स्वत:चा परिचय करुन देताने तो ब्रिटन येथे सिव्हिल इंजिनियर असल्याचे सांगितले.(Mumbai Drug Case: वांद्रेमध्ये 35 लाख रुपयांच्या मेफेड्रोनसह एका व्यक्तीला अटक, मुंबई गुन्हे शाखेची कामगिरी)

द इंडियन एक्सप्रेस यांच्या मते, पीडित महिलेने वाकड पोलीस स्थानकात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तिने असे म्हटले की, गेल्या डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मेट्रोमोनियल साइटवर त्या व्यक्तीचोसबत बातचीत सुरु झाली. काही दिवसानंतर फोनवर बोलणे व्हायला लागले. याच दरम्यान त्याने म्हटले की, त्याला भारतात यायचे आहे. पण तो तेथच राहिला.(Mumbai: गिगोलो बनण्याची होती इच्छा पण तरुणाला अशाप्रकारे लावला दीड लाखांचा चुना)

आरोपीने पीडित महिलेसोबत लग्न करण्याचा सुद्धा प्रस्ताव ठेवला. यासाठी महिला राजी सुद्धा झाली. त्यानंतर त्याने असे म्हटले की, मी प्रथम माझे संपूर्ण सामान आधी भारतात पाठवत असून नंतर मी येणार आहे. हे सामान भारतात आणण्यासाठी महिलेने खुप खर्च केला.

पीडित महिलेने असे म्हटले की, आरोपीच्या जवळजवळ 15 विविध खात्यांमध्ये तिने 62 लाख रुपयांची रोकड जमा केली. याच वेळी दिला कळले, तिची फसवणूक होत आहे. तेव्हा तिने पिंपरी-चिंचवड पोलिसांसोबत संपर्क साधत या प्रकरणी तक्रार दाखल केली. या संबंधित पुणे पोलीस दलातील संतोष पाटील यांनी अधिक तपास सुरु केला आहे.