Pune Weather Prediction, August 19: पुण्यात आज, 18 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 26.25 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.11 °C आणि 29.75 °C दर्शवतो. काही दिवसांच्या विश्रांती नंतर पुण्यात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. शनिवारी सायंकाळपासून पुणे शहरात जोरदार सरी कोसळल्या आणि रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. भारतीय हवामान विभाग (IMD) ने शहराच्या पूर्व भागात सर्वाधिक मुसळधार पावसाची नोंद केली आहे.सकाळी 8.30 ते रात्री 11 वाजेदरम्यान हडपसरमध्ये 112 मिमी, मगरपट्टा येथे 60 मिमी, शिवाजीनगरमध्ये 32 मिमी, लोणी काळभोरमध्ये 18 मिमी आणि पाषाणमध्ये 11 मिमी पाऊस झाला. संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली, रात्री 8 च्या सुमारास एक तास थांबली आणि रात्री 9 च्या सुमारास पुन्हा सुरू झाली. मुसळधार पावसामुळे हडपसर, वानवरी, एनआयबीएम रोड आणि कोंढव्यातील काही भागात पाणी साचले आणि वाहतूक कोंडी झाली. पुण्यात आजही मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता पुण्यात उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने पुण्यात उद्याचे हवामान याचा अंदाज लावला आहे. हेही वाचा: Pune Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रासह मुंबई ठाणे पालघर वगळता संपूर्ण राज्याच आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.