पावसाच महाराष्ट्रात आगमन झालं असून राज्याच्या अनेक भागात शुक्रवारपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्याला (Pune) देखील जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. पुण्यात शनिवारी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळं शहराच्या काही भागांमध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात आज, 11 जून 2024 रोजी तापमान 24.99 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 23.75 °C आणि 27.5 °C दर्शवतो.IMD ने मुंबई, रायगड आणि रत्नागिरीसाठी वादळ आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत इशारे जारी केले आहेत.पुण्यातही आज मुसळधार पाऊस आणि ढगांच्या गडगडाट व वादळवाऱ्याचा इशारा दिला आहे.हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर कृपया हवामान अंदाज पाहून घरच्या बाहेर जाण्याचे नियोजन कारा.आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने पुणे शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे..हेही वाचा: Mumbai Weather Forecast Today: पुढील 24 तासांत मुंबई शहरात असं राहिलं वातावरण, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
#हवामानअंदाज
आज व उद्या दक्षिण कोंकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी, उत्तर कोंकणासह मध्य व उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.#WeatherUpdate pic.twitter.com/PuEu7XQLds— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 11, 2024
महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. केरळमध्येही गेल्या 24 तासांत लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे, त्रिशूरमध्ये 11 सेमी आणि इतर अनेक प्रदेशांमध्ये 7 ते 9 सेमी पाऊस झाला आहे. .कर्नाटक, कोकण, गोवा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील किनारपट्टी भागातही मुसळधार पाऊस पडत आहे.