Pune Weather Prediction, June 21: पुण्यात गेल्या आठवड्या पासून पावसाने हजेरी लावलेली नाही. आज, 20 जून 2024 रोजी तापमान 27.99 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.54 °C आणि 30.29 °C दर्शवतो.पाऊस न पडल्यामुळे लोकाना पाणी टंचाई चा सामना करावा लागतोय. आज पुण्यात ढगाळ वातावरण असेल व संध्याकाळी कदाचित एकदम मध्यम सरी चा पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. 23 जून पासून पाऊस परत पुण्यात हजेरी लावेल असे IMD ने सांगितले आहे.आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने पुणे शहरात उद्याचे हवामान कसं असेल याचा अंदाज जारी केला आहे.हेही वाचा:Heavy Rains in Thane: पहिल्याच जोरदार पावसामध्ये ठाणे, भिवंडी भागामध्ये अनेक ठिकाणी साचलं पाणी (Watch Video)
पुणे चे उद्याचे हवामान कसे असेल?
आयएमडी वेबसाइटनुसार, पुणे आणि त्याच्या आसपासच्या पाषाण, कोरेगाव, मगरपट्टा, एनडीए, चिंचवड, लोहेगाव आणि लव्हाळे या भागात अंशतः ढगाळ आकाश असेल आणि दुपार आणि संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण असेल, एक किंवा दोन हलक्या सरी पडतील. व मुंबईत आज सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. IMD कडून आज मुंबई,ठाणे,कोकण किनारपट्टी व पालघर मध्ये पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा आहे .