Pune: सिझनमधील पहिल्या आंब्याच्या पेटीला मिळाला तब्बल 31,000 भाव; 50 वर्षातील सर्वात महाग पेटी
Alphonso Mango (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रातील हापूस आंब्याचे शौकीन असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील बाजारात आंब्याची एन्ट्री झाली आहे. मात्र, यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर समस्या पाहता आंब्याचे भाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल. बाजारात लिलावादरम्यान आंब्याची एक पेटी तब्बल 31,000 रुपयांना विकली गेली आहे. व्यापाऱ्याने दावा केला की 50 वर्षातील ही ‘सर्वात महाग’ खरेदी आहे. अशाप्रकारे आंब्याच्या हंगामात चांगला व्यवसाय व्हावा यासाठी व्यापाऱ्यांनी हात जोडून प्रार्थना केली.

देवगड रत्नागिरीतील प्रसिद्ध हापूस आंब्याची पहिली पेटी शुक्रवारी पुण्याच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाली. एपीएमसी मार्केटचे व्यापारी युवराज काची म्हणाले, ‘हे हंगामाच्या पहिल्या सुरुवातीचे आंबे आहेत. दरवर्षी एका विधीच्या रूपात आंब्याचा लिलाव केला जातो. यावरून पुढील दोन महिन्यांचे व्यवसायाचे भवितव्य ठरते. ही पहिली आंब्याची पेटी खरेदी करण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये 5,000 रुपयांपासून 31,000 रुपयांपर्यंत बोली लागली.

पुण्याच्या बाजारपेठेत आलेल्या आंब्याची पहिली बोली 18 हजार रुपये, दुसरी 21 हजार रुपये, तिसरी आणि चौथी 22.500 रुपये होती. क्रेट खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने सांगितले, ‘हे या हंगामापूर्वीचे आंबे आहेत. जेव्हा पहिला लॉट बाजारात येतो तेव्हा त्यांचा अशा प्रकारे लिलाव केला जातो आणि व्यापारी ते खरेदी करण्याचा प्रयत्न करतात.’ अशा पहिल्या पेटीला चांगला भाव मिळाले चांगले असते, कारण त्यामुळे व्यापाऱ्यांना घाऊक बाजारात चांगला भाव मिळण्यास मदत होते. (हेही वाचा: Weather Alert : राज्यातील तापमान वाढण्याची शक्यता, उन्हाळ्याची चाहूल)

ही गेल्या 50 वर्षात पुण्याच्या बाजारपेठेत सर्वाधिक बोली आहे. कोविड-19 महामारीच्या काळात गेल्या दोन वर्षांत व्यापार मंदावला होता आणि व्यापाऱ्यांचे नुकसान झाले होते. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, त्यामुळे यंदा आंब्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात आंब्याची आवक पूर्णपणे सुरू झालेली नाही. मात्र, लवकरच बाजारात हापूस आंब्याची आवक सुरू होईल, अशी आशा दुकानदारांना आहे.