PCMC Shocker : पिंपरी- चिंचवडमध्ये एका प्रेमवीराने त्याच्या गर्लफ्रेंड(Girlfriend)ला भेटायला आलेल्या एक्स बॉयफ्रेंडला (Ex Boyfriend)अलिशान चार चाकी (PCMC Accident News) गाडीने उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये निलेश शिंदे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सुशील काळे असे आरोपीचे नाव आहे. त्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. पुणे सध्या पोर्शे कार प्रकरणाने चर्चेत असतानाच, अशी घटना घडल्याने राज्यात तरूणांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. आरोपी सुशील काळे याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा:Pune Porsche Car Accident Case: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात छेडछाड प्रकरणी अजून एक पोलिसांच्या ताब्यात )
नेमक प्रकरण काय?
गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडला उडवण्याची ही घटना सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. जेव्हा सुशील काळे त्याच्या गर्लफ्रेंड सोबत टेल्को रोड यशवंत नगर या ठिकाणी होता. निलेश आणि तिच ब्रेकअप काही काळापूर्वीच झालेलं होतं. मात्र, तरीही निलेश हा तिला सतत त्रास देत होता. त्याची तक्रार युवतीने सुशीलकडे केली होती. रात्री उशिरा निलेश हा सुशील काळे असताना युवतीला भेटायला आला होता. याबाबतची माहिती तरुणीने सुशीलला दिली. सुशीलला संताप अनावर झाला आणि निलेश जेव्हा भेटायला आला, युवतीशी बोलत असताना सुशीलने त्याच्या चारचाकीने निलेशला उडवले. यात निलेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर पोलिसांना या अपघातासंदर्भात माहिती दिल्यानंतर प्रियकराला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला. सध्या पोलिस घटनेचा तपास करत आहेत.