Pune Shocker: पुण्यात दारूड्या बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

पुण्यात (Pune Crime News) पत्नीच्या दारुच्या मागणीला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची  घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या बहिणीला अटक केली आहे. व्यसन करण्यासाठी पत्नी पती कडे पैशांची वारंवार मागणी करत असल्याचे समोर आले असून या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा - Pune Shocker: ब्रेकअप झाल्याने संतापलेल्या तरुणाने केली प्रेयसीच्या आईची हत्या; आरोपीला अटक)

पत्नी दारू पिण्यासाठी पतीकडे वारंवार पैशांची मागणी करत असे. त्यावरून पती  आणि तिच्या बहिणीने छळ केला. त्याला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे. नारायण मधुकर निर्वळ (वय 35), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मृतकाचा भाऊ ज्ञानेश्वर मधुकर निर्वळ देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नारायण निर्वळ यांची पत्नी आणि तिची बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघींना अटक केली.

नारायण यांनी मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याबाबत भाऊ ज्ञानेश्वर निर्वळ यांना फोनवरून मेसेज केले होते. त्यावरून ज्ञानेश्वर यांनी पोलिसांकडे तक्रार केली. नारायण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मागील काही दिवसात व्यसनावरून नव्या वादाला सुरुवात झाली. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये मागील काही दिवसांत वाद होत होते.