
कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई, पुणे ही शहरं कोरोनाची महत्त्वाची हॉटस्पॉट्स आहे. दरम्यान दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने पुण्यामध्ये काही ठिकाणी रूग्णांवर वेळेवर अॅम्ब्युलंस, हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या घटना समोर आल्या आहे. आता नागरिकांची हीच गैरसोय टाळण्यासाठी पुणे विभागातील कोव्हिड रूग्णांसाठी त्यांच्या जवळपासच्या क्षेत्रातील हॉस्पिटलमध्ये आयसीयू, आयसोलेशन, व्हेंटिलेटरसह कुठे किती बेड्स उपलब्ध आहेत. याची माहिती ऑनलाईन मिळणार आहे. दरम्यान www.divcommpunecovid.com/ccsbeddashboard/hsr या डॅशबॉर्डवर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हॉस्पिटलमधील उपलब्ध बेड्सची माहिती मिळणार आहे. Coronavirus In Maharashtra: तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी.
दरम्यान रूग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रूग्णाच्या नातेवाईकांमध्ये भीती निर्माण होते. अशावेळेस गैरसोय टाळण्यासाठी आता नजिकच्या हॉस्पिटलमध्ये आवश्यकतेनुसार, थेट उपलब्ध बेड्स पाहून रूग्णाला दाखल करता येऊ शकतं. त्यासाठी आरोग्य विभागाकडून हा डॅशबोर्ड मदतीचा ठरणार आहे. दरम्यान आपत्कालीन परिस्थितीमध्ये 108 या क्रमांकावर रूग्णवाहिका मिळू शकते तर इअतर मदतीसाठी नागरिक पुणे कंट्रोल रूमला 020 25506800,25506801/2/3 या क्रमांकावरही मदत मागू शकतात.
दरम्यान महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 85,975 च्या पार पोहचला असून एकूण 3060 जणांचा बळी गेला आहे. तसेच कोविड19 चे राज्यात 43591 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती काल आरोग्य विभागाने दिली आहे. आता राज्यात कोव्हिडची सौम्य लक्षणं असणार्या रूग्णांना घरीच आयसोलेशनमध्ये ठेवण्याच्या नियमांमध्येही बदल करणात आले आहेत.