Pune Rains Update: पुणे शहरात ढगफुटी; पुरात वाहून गेलेल्यांची संख्या 7 वर, प्रशासनाचे बचावकार्य सुरू
Pune Flood (Photo Credits: Twitter/ ANI)

पुणे शहरामध्ये बुधावर (25 सप्टेंबर) ची रात्र अनेकांसाठी काळरात्र ठरली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसासोबतच काल ढगफुटी झाल्याने पुणे शहरासोबतच भोर, बारामती या असपासच्या तालुक्यामध्येही अतिवृष्टीमुळे पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. रात्रीच्या पुण्यातील अतिवृष्टीमुळे सहकार नगर परिसरातील भिंत कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूराच्या पाण्यात पुणे शहरात 7 जण वाहून गेल्याची माहिती देखील प्रशासनाने दिली आहे. Pune Rain: पुणे, बारामती मध्ये पावसाचा हाहाकार; नागरिकांनी शेअर केले पावसाच्या रौद्ररूपाचे व्हिडिओज आणि फोटोज

पुण्यातील अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, धनकवडी, बालाजी नगर, आंबेगाव, सहकार नगर, पर्वती, कोल्हे वाडी, किरकटवाडीया भागात पाणी साचल्याचे वृत्त अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी वृत्तसंस्थेला बोलताना दिली आहे. तसेच ANI सोबत बोलताना पुणे शहराचे जिल्हाधिकारी किशोर नवले यांनी गुरूवार (26 सप्टेंबर) दिवशी पुरंदर, बारामती, भोर या भागातील शाळा आणि महाविद्यालयांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करत असल्याअचं म्हटलं आहे.

रात्री कोसळलेल्या पावसाचा जोर आता कमी झाल्यानंतर अनेक ठिकाणी रस्त्यांवर, सोसायटीमध्ये चिखलाचं सम्राज्य पसरलं आहे. सध्या पूरामध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.