पुणे शहरात . त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने लोकांची वाहने पाण्यात बुडाली. मिळालेल्या माहितीनुसार, नदीत जास्त पाणी सोडल्याने अनेकांचे नुकसान होऊ शकते. वाहने पाण्यात बुडाल्यानंतर लोक जीव धोक्यात घालून वाहने बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधीही धरणातून पाणी सोडण्यात आले होते, त्यामुळे शहरातील अनेक संकुलातील लोकांच्या घरात पाणी शिरले होते. यामध्ये नागरिकांचेही मोठे नुकसान झाले.  (हेही वाचा - Maharashtra Rain Alert: पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज)

पाहा व्हिडिओ -

नागरिकांनी नदी पात्रात उतरु नये याची खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. खडकवासला धरणक्षेत्र परिसरात पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. या पार्श्वभूमिवर 27 हजार 841 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. रात्री 11 वाजता 35 हजार 310 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.

मुठा नदीत पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने भिडे पूल पाण्याखाली गेल्याने नदी पात्रात वाहनचालकांनी पार्क केलेल्या गाड्या पाण्याखाली अडकल्या आहेत. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात 24 आणि 25 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जारी केला आहे.