पुण्याच्या (Pune) कल्याणी नगर (Kalyani Nagar) भागात एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेमध्ये दोन अभियंतांना उडवल्या प्रकरणी आता आरोपीच्या वडिलांना आणी आजोबांना जामीन मंजूर झाला आहे. ड्रायव्हरला किडनॅप करून धमकावल्याप्रकरणी हा जामीन मंजूर झाला आहे. आरोपीचे वडील Vishal Agarwal यांच्यावर एकूण या प्रकरणात 3 गुन्हे आहेत त्यापैकी दोन प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे पण एक प्रकरण अद्याप बाकी असल्याने सध्या ते तुरूंगातच राहणार आहेत. तर आजोबा Surendra Kumar Agrawal यांची तुरूंगातून आता सुटका होऊ शकते. पोलिसांपासून ससूनमधील डॉक्टरांनी आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याने हे प्रकरण विशेष गाजले आहे.
19 मे च्या रात्री पुण्यातील कल्याणी नगर चौकात झालेल्या अपघातानंतर त्याचे पडसाद सर्वदूर पसरले. मुलाच्या प्रेमापोटी त्याला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडूनही अनेक गुन्हे झाले. यामध्ये रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी सध्या आरोपी मुलाचे आई बाबा येरवडा जेल मध्ये आहेत. तर ड्रायव्हर गंगारामला धमकावल्याच्या प्रकरणामध्ये बाप-लेकाला जामीन मंजूर झाला आहे.
#WATCH | Pune, Maharashtra: Advocate Prashant Patil says, "The driver had filed a complaint with the crime branch against Mr Surendra Agarwal and Mr Vishal Agarwal. We filed two separate bail applications. We pleaded before the court that prima-face it is a fake complaint...Pune… https://t.co/LRSiT5imVf pic.twitter.com/Oj6H7a752j
— ANI (@ANI) July 2, 2024
अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हर गंगारामला 'तू कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग' असं विशाल अग्रवालने सांगितल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आणि आरटीओच्या तक्रारीचेही गुन्हे आरोपीच्या वडीलांवर दाखल आहेत. Vishal Agarwal, Surendra Agarwal यांचा पाय अधिक खोलात; स्थानिक व्यावसायिकाच्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल .
अल्पवयीन आरोपी मुलाला 25 जून रोजी बालसुधारणागृहातून घरी सोडण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालाविरूद्ध पोलिसांनी सर्वोच्च न्यायालययत धाव घेतली आहे. निर्भया प्रकरणानंतर 17 वर्षांवरील व्यक्तीने थंड डोक्याने गुन्हेगारी कृत्य केल्यास त्याला सज्ञान म्हणून वागणूक देण्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी पावले उचलत सत्र न्यायालयाकडे याचिका दाखल केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी काही पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळात बोलताना सांगितले आहे.