पुणे पोलिसांनी (Pune Police) शहरातील आजी माजी नगरसेवकांना धमकी देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. इम्रान शेख असे आरोपीचे नाव असून तो कोंढवा परिसरात राहतो. पंचवीस वर्षांचा हा तरुण प्रेमास नकार मिळाल्याने दुखावला होता. त्याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र, प्रेमास नकार मिळाल्याने या तरुणाे कथीत गर्लफ्रेंडला धडा शिवण्याचे ठरवले. नकार मिळाल्याच्या रागातून तो सुडाने पेटला. त्याने शहरातील नगरेसवकांना खंडणी मागण्यास सुरुवात केली. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलाला पुण्यात पहिल्यांदा धमकी आली. त्यानंतर पुण्याचे माजी महापौर मुरलीधर महोळ यांना अज्ञाताकडून धमकी आली. त्यानंतर पुढच्या काहीच दिवसात आरोपीने माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना धमकी दिली . आरोपी येवढ्यावरच थांबला नाही. त्याने पिंपरी चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनाही धमकी दिली आणि त्यांच्या कार्यालयात फोन करुन 30 लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्या मोबाईलवरी यासंदर्भात मेजेस पाठविण्यात आला होता. (हेही वाचा, Pune: पुणे येथील माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना धमकी, 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी)
नगरसेवकांना आलेली धमकी आणि आरोपीने धमकीसाठी वापरलेले शब्द, परिस्थीत या गोष्टींचा अभ्यास करता सर्व प्रकरणांमध्ये एकच पॅटर्न असल्याचे समोर आले होते. प्रत्येक वेळी आरोपी वेगवेगळ्या नगरसेवकांना फोन करत होता आणि मुलीच्याच नावे खंडणी मागत होता. प्रत्येक वेळी हा आरोपी पुणे शहरातील खराडी परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इनोव्हा गाडीत पैसे ठेवा, असे सांगत असे. पोलिसांसमोर हा एक गुंतागुंताचा प्रकार होता. पण, पोलिसांनी तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात देण्यात आलेल्या सर्वच धमक्या या एकाच आरोपीने दिल्या होत्या.
पोलिस तपासात पुढे आलेली बाब अशी की, आरोपी इम्रान शेख याला एक मुलगी आवडत होती. त्याला त्या मुलीसोबत लग्न करायचे होते. मात्र, तिने त्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने इम्रान सुडाने पेटला आणि त्याने मुलीचीच बदनामी करण्याचा घाट घातला. तो बनाव रचत गेला. तो नगरसेवकांना धमकी देत असे आणि मुलीच्या कारचा नंबर सांगू त्यात खंडणीची रक्कम ठेवायला सांगत असे. यावरुन पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली.