PMPML Photo Credits: commons.wikimedia

पुणे महानगरपालिकेने विद्यार्थ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited )बसने फिरण्यासाठी मोफत पास (Free Bus Passes ) देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये पालिकेच्या शाळा आणि प्रायव्हेट शाळांचा समावेश आहे. पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत तर प्रायव्हेट शाळेच्या विद्यार्थ्यांना 75% सूट दिली जाणार आहे. या प्रोजेक्ट करिता पालिका 21 कोटी रूपयांची मदत करणार आहे. त्यासाठीची सबसिडी मंजूर करण्यात आली आहे.

गरीब विद्यार्थ्यांना मदतीसाठी पुणे पालिका प्रशासनाकडून हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी पलिकेने पुढाकार घेत विद्यार्थ्यांना मोफत प्रवास खुला केला आहे. प्रवासाच्या असुविधेमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी पालिकेने हा उपक्रम सुरू केला आहे.सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांना या सुविधेमुळे फायदा होणार आहे.

PMPML ही वाहतुक सुविधा 2007 साली पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट आणि पिंपरी चिंचवड म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट यांचा एकत्र उपक्रम आहे.