
Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कंपनीत पगारावरून वाद टोकाला पेटला आहे. कर्मचाऱ्याने पगार मागितल्यावर त्याला मारहाण करण्यात आली. या घटनेत त्याचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनी ही दुर्घटना घडली आहे. अविनाश भिडे असं मृत इसमाचे नाव आहे. तो पुण्यातील धायरी परिसरात राहत होता. याप्रकरणी अविनाश भिडेच्या पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी १३ आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अविनाश मशनि ऑपरेटर म्हणून शिवाजीनगर येथील शेखर महादेव जोगळेकर यांच्या ऑफिसमध्ये कामाला होते. महिन्याभराचा पगार मागितल्यावरून दोघांत वाद झाला होता.यापूर्वीही शेखर आणि अविनाश यांच्या वाद झाला होता. अविनाशला बऱ्याचवेळा शिवीगाळ केली होती. त्यांच्यात आरोपींनी भिडे यांना सप्टेंबरमध्ये बेदम मारहाण करण्यात आली होती. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाऱ्या दरम्यान त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
या प्रकरणात अविनाश यांच्या पत्नीने चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुध्दात तक्रार दाखळ केली. पोलिसांनी फिर्यादीनुसार १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.या प्रकराणात पोलिन निरिक्षक अधिक तपास करत आहे.