पुण्यात अवैधपणे विक्री होत असलेल्या ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या (Drugs) वापरावरुनही राजकीय वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्जप्रकरणावरुन गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातल्या लिक्विड लिजर हॉटेल्समध्ये सर्रासपणे ड्रग्ज पार्टी होत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आता या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. या हॉटेलमध्ये गुन्हे शाखेची अमली पदार्थ विरोधी पथक दाखल झाले असून त्यांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी मॅनेजरसोबत या ठिकाणी काम करत असलेल्या एक कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. हे हॉटेल सील केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. (हेही वाचा - Pune Crime: अल्पवयीन मुलीवर वडिलांसह, काका आणि चुलत भावाकडून बलात्कार; हडपसर परिसरातील घटना)

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरण सिंह राजपूत देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुणे पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण सुरू करण्यात आलं आहे. यासोबतच लिक्विड लिजर लाउंज या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत. पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. पुण्यातील अशाच एका हॉटेलमधील पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सुषमा अंधारे यांनी ज्यांच्यावर बार मालकांकडून हफ्ते घेत असल्याचा आरोप केला, ते एक्साईज विभागाचे अधिकारी चरण सिंग राजपूत यांनीही पुण्यातील त्या हॉटेलला भेट दिली. आता, एक्साईज विभागाकडून देखील कारवाईला सुरुवात झाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर घटनास्थळी दाखल आहेत.