Accident (PC - File Photo)

Pune Milk Truck Accident:  पुण्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. पुण्यात सकाळी 8 च्या सुमारास दुधाच्या टॅंकरचा भीषण अपघात(Accident) झाला आहे.  शिवाजीनगर येथे राहुल टॉकीज पुढे असलेल्या पुलाजवळ दुधाच्या टॅंकरचा अपघात झाला. हा टँकर थेट डिव्हायडरला धडकल्याने टॅंकरचा समोरील भागाचा चेंदामेंदा झाला आहे. गाडी धडकल्याने गाडीत असलेल्या हजारो लीटर दूध रस्त्यावर सांडले आहे. वाहन चालकांला दुखापत झाल्याचे समोर आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला. दुध आणि ऑईल सांडल्यामुळे रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना रस्त्यावरून जाताना काळजी घेण्याचे आवाहन पोलीस कर्मचाऱ्यांनी केले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. पोलीसांनी गंभीर जखमेत असलेला वाहन चालकांला रुग्णायलात दाखल केले आहे.

वाहन चालकांचा शिवाजीनगरातील राहुल टॉकीज पुलाजवळ आल्यावर अचनात वाहनावरिल नियंत्रण सुटलं त्यामुळे वाहन चालक अचानक डीव्हाडरला आढळला. या धडकेत वाहनाचा समोरीला भागाचा चेंदामेंदा झाला. आणि वाहनाचा मोठा अपघात झाला. या अपघातात चालकांला गंभीर दुखापत झाली. आणि वाहनात असलेलं संपुर्ण हजारो लीटर दुध रस्त्यावर पडलं. आईल आणि दुधामुळे रस्ता देखील खराब झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. हा ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या आपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी येथील वाहतूक कोंडी सुरुळीत केली