Pune Metro : सुरुवातीला, सिविल कोर्ट ते स्वारगेट पर्यंतची मेट्रो सेवा ऑगस्टमध्ये जनतेसाठी खुली होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक बाबींमुळे ते काम लांबणीवर पडले. आता बांधकाम अंतिम टप्प्यात सुरू असून येत्या काही दिवसांत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असा अहवाल अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे सिविल कोर्ट ते स्वारगेट हा पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सुरू होण्याचे अपेक्षा आहे.(हेही वाचा:Pune Metro: पुणे मेट्रोचा विक्रम! एकाच दिवसात प्रवासी संख्या दुप्पट)
मिळालेल्या माहितीनुसार, 'काम पूर्णत्वाच्या जवळ आल्याने, महा मेट्रोने मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांच्याशी संपर्क साधला आहे. तीन स्थानकांसह संपूर्ण भागासाठी सुरक्षा तपासणीची व्यवस्था केली आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत हा मार्ग सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे,' असे महा मेट्रोच्या अधिकाऱ्याने सांगितले. गणेशोत्सवाच्या अखेरीस स्वारगेट मार्ग सुरू होईल, अशी आशा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.(हेही वाचा: Pune Metro: मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावरुन पडून प्रवाशाचा मृत्यू; पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात)
फेब्रुवारी 2024 मध्ये, महा मेट्रोकडून दिवाणी न्यायालय आणि स्वारगेट दरम्यान रेकची चाचणी चालवली होती. दिवाणी न्यायालय ते स्वारगेटपर्यंत मेट्रो सुरू करण्याला प्राधान्य देण्याची योजना असतानाच महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी कात्रज विस्ताराचे काम सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.