Pune Metro: पुणे मेट्रोचा विक्रम! एकाच दिवसात प्रवासी संख्या दुप्पट
Pune Metro (PC - Wikimedia Commons)

पुणे मेट्रोची (Pune Metro) वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी ते जिल्हा न्यायालय या विस्तारित मार्गांवरील प्रवासी संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पुणे मेट्रोने 30 जून रोजी 1,99,437 प्रवाशांची विक्रमी संख्या गाठून तब्बल 24,15,693 ची एकूण कमाई केली, जी आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या आहे.1,99,437 प्रवाशांपैकी 83, 426 प्रवाशांनी लाईन एकवरून (पीसीएमसी ते जिल्हा न्यायालय) तर 1,16,011, प्रवाशांनी लाईन दोनवरून मेट्रोने प्रवास केला आहे. पीसीएमसी मेट्रो स्थानकात सर्वाधिक 19,919 प्रवाशांची नोंद झाली, त्यापाठोपाठ पीएमसी (18,079), शिवाजीनगर (17,046), पुणे रेल्वे स्थानक (15,378) आणि रामवाडी (14770) येथे प्रवाशांची सर्वाधिक नोंद झाली.  (हेही वाचा - Mumbai Stray Dog: मुंबईत तीन वर्षांत 3 हजार श्वान दंशाच्या घटनांमध्ये वाढ)

पाहा पोस्ट -

पुण्यात लाईन एकने 16 जून 2024 रोजी 36, 932 प्रवाशांची सर्वाधिक संख्या गाठली, तर लाईन दोनने 25 जून 2024 रोजी 64,378 प्रवाशांसह शिखर गाठले. 15 ऑगस्ट  1,68, 012  प्रवाशांसह आणि  6 ऑगस्ट 2023 रोजी लाइन 1 आणि लाइन 2 या दोन्ही मार्गावर तब्बल 1,31,027 प्रवाशांसह सर्वाधिक प्रवासी नोंदवले गेले होते. विशेष म्हणजे, लाईन एकने 16 जून 2024 रोजी 36,932 प्रवाशांची सर्वाधिक संख्या गाठली, तर लाईन दोनने  25 जून 2024 रोजी 64,378  प्रवाशांसह शिखर गाठले.

पुणे मेट्रोच्या एक पुणे महाकार्ड आणि एक पुणे विदयार्थी  महाकार्डमध्येही अनुक्रमे 39, 025 आणि 10,522  कार्डांची विक्री झाली आहे. काल, पीसीएमसी मेट्रो स्टेशन, पीएमसी, शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्टेशन, रामवाडी, जिल्हा न्यायालय, वनाझ, डेक्कन जिमखाना, नश स्टॉप आणि भोसरी ही प्रवासी संख्येच्या बाबतीत विक्रमी 10 स्थानके होती.