
Pune Crime News: पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण पसरले आहे. पुण्यातील वडगावशेरी परिसरात बुधवारी एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मृत तरुण हा देखील सराईत आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अभिषेक राठोड असं नाव असलेल्या व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे.हत्ये मागचा हेतू अद्याप गूढ आहे. येरवडा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्दात गुन्हा दाखल.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक हा वडगावशेरी येथील ब्रह्मा सनसिटी सोसायटीत रहिवासी होता. सायंकाळी घरातून निघाले असताना सात ते आठ हल्लेखोरांनी त्यांना अडवले. धारदार शस्राने त्याच्यावर वार करून त्याला गंभीर केले. या घटनेची माहिती मिळताच,पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी सुरु करण्याच्या आधीच मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला असून अद्याप अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. राठोडच्या हत्येमागे वैयक्तिक वाद किंवा वैर असण्याची शक्यता पोलिसांनी दर्शवली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन बाईक आणि एक धारदार शस्त्र जप्त केले आहे. पोलिसांनी अभिषेक राठोडचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास करण्यासाठी पथके नेमली आहे.येरवाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.