Pune: अल्पवयीन मुलीसमोरच पतीने केली पत्नीची हत्या, आरोपीला पोलिसांकडून अटक
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

पुण्यात (Pune) सोमवारी धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील वाकड परिसरात सोमवारी एका पतीने आपल्या नऊ वर्षांच्या मुलीसमोर पत्नीची हत्या (Murder) केली आहे. नंतर हा आरोपी गुन्हा करून पळून गेला. पण नंतर आरोपीला पोलिसांनी (Pune Police) पकडून अटक केली आहे असे पोलिसांनी सांगितले. ललिता पुजारी (30) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा नवरा रमेश (35) हा मजूर आहे. पोलिसांनी सांगितले की, या जोडप्याला तीन मुले आहेत. त्यापैकी दोन मुल, एक पाच वर्षांचा मुलगा आणि एक नऊ वर्षांची मुलगी, हत्येच्या वेळी घरी होते. या जोडप्याची 11 वर्षांची मोठी मुलगी नातेवाईकाच्या घरी गेली होती.

सुत्राच्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे तीन वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की रमेशने त्याच्या पत्नीवर हल्ला केल्याची माहिती दिली. “त्यानंतर, पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि ललिता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली,” असे सूत्राने सांगितले. (हे देखील वाचा: Crime: पूर्ववैमनस्यातून चुलत भावाची हत्या, शरीरावर तब्बल 38 वार करत धाडले मृत्यूच्या द्वारी, आरोपीस अटक)

घरगुती कारणावरून वाद 

“आम्हाला कळले आहे की पती-पत्नीमध्ये काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद होत होते. सोमवारी पहाटे दोघांमध्ये भांडण झाले. मारामारीमुळे त्यांची नऊ वर्षांची मुलगी जागी झाली होती. त्या व्यक्तीने आपल्या पत्नीला दगडी फरशीच्या तुकड्याने मारले ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. या व्यक्तीने मुलीसमोर पत्नीची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, असे वाकड पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक बालाजी ठाकूर यांनी सांगितले.